मुंबई -येत्या जुलै महिन्यात म्हाडाच्यावतीने चार हजार घरांसाठी लॉटरी ( Lottery for Four Thousand Houses MHADA ) काढण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि स्वस्त घरे देण्यासाठी म्हाडा तत्पर असते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या ( MHADA Lottery in Mumbai ) घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा करत आहे. मुंबईत विविध ठिकाणी म्हाडाच्यावतीने घरे उभारण्यात येतात. आता अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ( Low Income Group Citizens ) म्हाडाच्यावतीने येत्या जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- 'या' परिसरात असणार घरे
जुलै महिन्यात म्हाडातर्फे काढण्यात येणाऱ्या सोडतीतील घरे ही गोरेगाव डोंगर परिसरात असणार आहेत. सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून यापैकी बहुतेक घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ही घरे वन रूम किचन या प्रकारात मोडणारी असून सुमारे यामाध्यमातून १२३९ घर उपलब्ध होणार आहेत. तेवीस मजल्यांच्या सात इमारतींमध्ये ही घरे असणार आहेत. तर उन्नत नगर क्रमांक 2 येथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- अन्य उत्पन्न गटांसाठी ही घरे