महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विक्रोळीतील टागोरनगरमध्ये बदामाचे झाड कोसळून चार नागरिक जखमी - injure

मुंबईत झाड कोसळण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे झाडाखालून जात असताना सावधगिरीने जाण्याची गरज आहे. मुंबईत मागच्या काही घटनेत झाड कोसळून मृत्यूसारख्या घटना घडल्या असल्याने झाडाखालून जाताना नागरिक भीती व्यक्त करत आहेत.

विक्रोळीतील टागोरनगरमध्ये बदामाचे झाड कोसळून चार नागरिक जखमी

By

Published : May 18, 2019, 11:14 PM IST

मुंबई - विक्रोळीतील टागोरनगर येथील ग्रुप ४ मध्ये मिलिंद सुरवाडे मार्गावर बदामाचे एक मोठे झाड आज दुपारी रस्त्यावर कोसळले. या अपघातात चार नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

विक्रोळीतील टागोरनगरमध्ये बदामाचे झाड कोसळून चार नागरिक जखमी

मुंबईत झाड कोसळण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे झाडाखालून जात असताना सावधगिरीने जाण्याची गरज आहे. मुंबईत मागच्या काही घटनेत झाड कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याने झाडाखालून जाताना नागरिक भीती व्यक्त करत आहेत.

या घटनेत मोहम्मद अश्फाक शहा, मोहसीन मोहम्मद मुबीन शेख, अब्दुल रहमान शेख, सुखलाल रामचंद्र पट्टे हे जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे रुंदीकरणाचे काम सुरू होते. या गटारालाच लागून मोठे बदामाचे झाड उभे होते. या झाडाची मुळे या कामात कापली गेल्याने अचानक आज झाड कोसळले. या कोसळलेल्या झाडाखाली एक टेम्पो, तीन दुचाकी आल्याने वाहन चालक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना त्वरित जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details