मुंबई -राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल पर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन धसका घेत, मुंबईत काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी मुंबई सोडून जाण्यात सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवरून 4 लाख 50 हजार परप्रांतीय मजुरांनी आपले गाव गाठले आहे.
गेल्या वर्षी प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. परिणामी संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. त्यामुळे लाखोंच्या संख्येत परप्रांतीय मजुर मिळेल त्या वाहनांच्या मदतीने आपले गाव गाठले होते. यादरम्यान अनेक अपघात होऊन श्रमिकांच्या मृत्यू ही झालेला होता. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांची गैरसोय झालेली होती. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. मुंबईसह राज्यभरात निर्बंध घातले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या धसका परप्रांतीय मजुरांनी घेतला आहे. गेल्यावर्षी सारखी गैरसोय होऊ नयेत, म्हणून परप्रांतीय मजुरांनी परतीचा प्रवास सुरु केला आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मोठ्या प्रमाणात गर्दीही दिसून येत आहेत.
414 मेल-एक्स्प्रेस-
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दररोज मुंबईच्या सीएसएमटी, दादर आणि एलटीटी रेल्वे स्थानकावरून प्रत्येक दिवशी 138 मेल-एक्स्प्रेस गाड्या दररोज ये-जा करतात. त्यानुसार सरासरी दररोज 1 लाख 51 हजार 800 परप्रांतीय मजुरांना रेल्वेच्या माध्यमातून आपले गाव गाठत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत आतापर्यत 4 लाख 55 हजार 400 परप्रांतीय मजुरांनी प्रवास केला आहे. पुढ्याच्या 15 दिवसांचे बिहार, उत्तरं प्रदेश, झारखंड सारख्या राज्यात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल असल्याची माहिती मिळते आहेत.
विशेष गाड्याचा फायदा परप्रांतीय मजुरांना-
दर वर्षी उन्हाळच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशासाठी विशेष आणि साप्ताहिक गाड्या चालविण्यात येत आहे. मुंबई-गोरखपूर विशेष, पुणे-दनापूर, मुंबई-पटना, मुंबई- गोरखपूर विशेष आणि मुंबई-दरभंगा सारख्या अनेक गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यांच्या फायदा परप्रांतीय मजुरांना होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा नियमानुसार फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली गेली आहेत. त्यामुळे एका मेल-एक्स्प्रेसमधून 1100 प्रवासी प्रवास करू शकता. त्यामुळे गर्दी वाढू नयेत, म्हणून या विशेष गाड्याचा फायदा गावी जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांना होत आहेत.