महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Reservation : मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीवर ३९९ सूचना व हरकती - 399 suggestions and objections

मुंबई महापालिका (on Mumbai Municipal Election Reservation Draw) निवडणुकीसाठी २९ जुलैला आरक्षण (BMC Reservation Draw) लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीवर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. हरकती सूचनांसाठी आज शेवटचा दिवस होता. २ ऑगस्ट पर्यंत ३९९ सूचना व हरकती (399 suggestions and objections got) प्राप्त झाल्या आहेत.

BMC Reservation Draw
मुंबई महापालिका निवडणुक आरक्षण सोडत

By

Published : Aug 3, 2022, 8:23 PM IST

मुंबई : मुंबई महापालिका (on Mumbai Municipal Election Reservation Draw) निवडणुकीसाठी २९ जुलैला (BMC Reservation Draw) आरक्षण लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीवर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. हरकती सूचनांसाठी आज शेवटचा दिवस होता. २ ऑगस्ट पर्यंत ३९९ सूचना व हरकती (399 suggestions and objections got) प्राप्त झाल्या आहेत.

३९९ सूचना हरकती :राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत नुकतीच काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांन्वये व त्यानुसार निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आजपर्यंत ३९९ सूचना हरकती प्राप्त झाल्या आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


२ ऑगस्ट अंतिम तारीख :यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गांसाठी ३१ मे २०२२ च्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर नुकत्याच झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या अनुषंगाने हरकती नोंदविण्यासाठी २ ऑगस्ट ही अंतिम तारीख होती.

हेही वाचा :BMC Street Tender : खड्डे मुक्त मुंबई; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेचे ५८०० कोटींचे कंत्राट

ABOUT THE AUTHOR

...view details