महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत ड्रग तस्कराला अटक, 1 किलो 10 ग्राम चरस जप्त - ड्रग तस्कर अटक गोरेगाव

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलच्या कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरातून एका ड्रग तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून 1 किलो 10 ग्राम चरस जप्त करण्यात आले आहे.

drug smuggler mumbai arrested
ड्रग तस्कर अटक मुंबई

By

Published : Dec 26, 2021, 7:45 PM IST

मुंबई -मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलच्या कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरातून एका ड्रग तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून 1 किलो 10 ग्राम चरस जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा -लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, केंद्र सरकारच्या गाईडलाईनची प्रतिक्षा

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात 30 लाख इतकी किंमत आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने अमली पदार्थ कोणासाठी आणले होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही चरस यूपीमधून मुंबईत आणल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे.

हेही वाचा -Mahavikas Aghadi Leaders Meets Governor : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details