मुंबईमुंबईमध्ये दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले होते. यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने निर्बंध हटवल्याने सर्व सण धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव Ganeshotsav 2022 आला आहे. यासाठी सर्व मंडळे सज्ज झाली आहेत. यावर्षी पुन्हा भाविकांना उंच मुर्त्या आणि देखावे पाहायला मिळणार आहेत. मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा खेतवाडी गणेशोत्सव मंडळाने Khetwadi Ganeshotsav Mandal तयार केलेली, परशुरामाच्या अवतारामधील ३८ फूट उंच मूर्ती पाहायला मिळणार आहे. सर्वात उंच मूर्ती त्यासोबत सामाजिक संदेश देणारी सजावट हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यावेळी मंडळाकडून सजावटीसाठी पुर्णपणे इको फ्रेंडली वस्तूंचा completely eco friendly materials decoration वापर करण्यात आला आहे.
परशुरामाच्या अवतारामधील ३८ फूट उंच मूर्तीखेतवाडी ११ वी गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९६१ रोजी झाली. मंडळाचे उत्सवाचे हे ६१ वे वर्ष आहे. यंदा ३८ फूट उंच, श्री गणेशमूर्तीची स्थापना केली जाणार आहे. परशुरामाच्या अवतारामधील उभी गणेशमूर्ती हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. गणेशमूर्तीला चार हात असून मूर्तिच्या एका हातात परशु, दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ, तिसऱ्या हातात धनुष्यबाण तर चौथा हात आशीर्वाद देतांना दाखवण्यात आला आहे. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील यांनी साकारली आहे. मुंबईतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ही सर्वात उंच गणेशमूर्ती असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. २०१९ मध्ये या मंडळाकडून ३० फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.