मुंबई -मध्य रेल्वेवरील ( Central Railway Megablock ) ठाणे ते दिवा ( Thane To Diva ) पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कळवा ( Thane To Kalwa ) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ( Central Railway Megablock Time ) असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या ( Central Railway Mail Express Cancle ) रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात ( Central Railway Timetable Change ) बदल करण्यात आला आहे.
असा असेल ३६ तासाचा मेगाब्लॉक -
या मेगा ब्लॉकदरम्यान शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या, अर्धजलद सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाही. पुढे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. दुपारी २ नंतर अप धीमी-अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. शनिवारी दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या-अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी २.०० नंतर, डाउन धिम्या-अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
असे होणार काम -
या ब्लॉक कालावधीत ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे ब्लॉक कालावधीत केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट-ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाणार आहे.