मुंबई - महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण हा एकेकाळी चर्चेचा विषय बनला होता. दर्जाहीन शिक्षणामुळे महापालिकेवर सतत टीका होत होती. मात्र महापालिकेने ( Mumbai Municipal Corporations School ) सुरू केलेल्या इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज शाळा तसेच डिजिटल शिक्षण यामुळे महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
Mumbai Municipal Corporations School : मुंबई महापालिकेच्या शाळांना अच्छे दिन: ३५ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश - मुंबई महापालिका शाळा लेटेस्ट न्यूज
दर्जाहीन शिक्षणामुळे महापालिकेवर सतत टीका होत होती. मात्र महापालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज शाळा तसेच डिजिटल शिक्षण यामुळे पालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
महापालिका शाळांना प्राधान्य - महापालिकेने ( Mumbai Municipal Corporations School ) सुरू केलेले इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा, शाळांच्या इमारतींची डागडुजी, पायाभूत सुविधांसह अन्य शैक्षणिक सोयींमधील लक्षणीय सुधारणा आणि दैनंदिन शैक्षणिक कामकाजात विद्यार्थीस्नेही उपक्रमांचा समावेश यामुळे पालकांनी महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporations School ) शाळांना प्राधान्य दिले आहे. शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षीही विद्यार्थ्यांचा ओघ अधिक आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया जुलैपर्यंत चालणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दर्जेदार डिजिटल शिक्षण -महापालिका ( Mumbai Municipal Corporations School ) शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याने विद्यार्थी संख्या कमी होत होती. यावर उपाय म्हणून महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले. विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले. खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी सीबीएसई, आयसीएसई मंडळांशी शाळा संलग्न करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आयबी आणि केंब्रीज या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी करार करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक १३६८१ विद्यार्थानी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्याखोलाखाल मराठी ८०७९, हिंदी ६९८४, उर्दू ६०३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदा नव्या एक लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट पालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल स्कूलमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दुप्पट प्रवेश महापालिकेच्या शाळांमध्ये झाले आहेत.