महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुढील महिन्यात ओमायक्राॅन रुग्ण व मृत्यूत वाढ होण्याची भीती; ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह - बेड कोरोना केअर सेंटर मुंबई

ओमायक्राॅनचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून कोरोना केअर सेंटर १ व २ मध्ये तब्बल ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 27, 2021, 10:51 PM IST

मुंबई - मुंबईत गेले पावणेदोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार असताना त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमायक्राॅन व्हेरिएंट घातक नसला तरी त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पुढील महिन्यात ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्ये वाढ होण्याची चिंता पालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, मुंबईकरांसाठी जानेवारी महिना टेंशनचा असणार आहे. ओमायक्राॅनचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून कोरोना केअर सेंटर १ व २ मध्ये तब्बल ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा -Anger of Matang community : मातंग समाजाचा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश

ओमायक्रॉनविरोधात पालिका सज्ज -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या पावणे दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याच व्हेरिएंटमुळे भारतात तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत ओमायक्राॅनचे ८५ रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी, त्याचा झपाट्याने प्रसार होत असल्याने मुंबई महापालिका ओमायक्राॅन विषाणू विरोधात सज्ज झाली आहे.

३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह -

ओमायक्राॅनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढील महिन्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये वाढ होण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे. यामुळे ओमायक्राॅनचा प्रसार वेळीच रोखता यावा, रुग्णांवर वेळीच उपचार करता यावे, यासाठी कोरोना केअर सेंटर १ व २ मध्ये तब्बल ३५ हजार २८ बेड्स अॅक्टिव्ह करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले. तसेच, बाधितांना लागणारी औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागणारी सामग्री याची योग्य ती तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ख्रिसमस, थर्टी फर्स्ट, नव वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोरोना केअर सेंटरमधील बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आले आहेत.

सध्या कोरोना केअर सेंटरमधील बेड्स -

१२९ कोरोना केअर सेंटर १ मध्ये २२,३७८ बेड्स

सध्या उपचार घेणारे रुग्ण - ५३१

----

९८ कोरोना कोरोना केअर सेंटर २ मध्ये १२,६५० बेड्स

सध्या उपचार घेणारे रुग्ण - ४२

----

मुंबईत एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - ४,२९५
यात लक्षणे नसलेले - २,३१९
लक्षणे असलेले रुग्ण - १,८३९
गंभीर (क्रिटिकल) असलेले रुग्ण - १३७

हेही वाचा -वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार अजित पवार यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details