महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Genome Sequencing Tests - डेल्टा व्हेरियंटचे ३५, डेल्टा डेरिव्हेटीव्हचे ६५ तर ओमायक्रॉनचे २ टक्के रुग्ण - महाराष्ट्र ओमायक्रॉन रुग्णसंख्या

कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती वेळीच मिळवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी पालिकेकडून ( Municipal Corporation ) टप्प्या टप्प्याने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या ( Genome Sequencing Tests ) केल्या जात आहेत. सहाव्यांदा या चाचण्या करण्यात आल्या असून २९७ नमुन्यांमध्ये ३५ टक्के डेल्टा व्हेरियंट ( 35% Delta Variant ), ६२ टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्ह ( Delta Derivatives ) तर २ टक्के ओमायक्रॉनचे ( Omicron ) रुग्ण आढळून आले आहेत.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन

By

Published : Dec 15, 2021, 9:21 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूचा ( Omicron Virus ) प्रसार आहे. हा किती प्रमाणात वाढला आहे, कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती वेळीच मिळवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी पालिकेकडून ( Municipal Corporation ) टप्प्या टप्प्याने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या ( Genome Sequencing Tests ) केल्या जात आहेत. सहाव्यांदा या चाचण्या करण्यात आल्या असून २९७ नमुन्यांमध्ये ३५ टक्के डेल्टा व्हेरियंट ( 35% Delta Variant ), ६२ टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्ह ( Delta Derivatives ) तर २ टक्के ओमायक्रॉनचे ( Omicron ) रुग्ण आढळून आले आहेत.

  • सहाव्या फेरीचा अहवाल

मुंबईमध्ये चाचणी करण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंगच्या चाचण्यांच्या सहाव्या फेरीत एकूण २९७ नमुन्यांपैकी ६२ टक्के अर्थात १८३ नमुने हे डेल्टा डेरिव्हेटीव्ह या व्हेरियंटने तर ३५ टक्के अर्थात १०५ नमुने हे डेल्टा व्हेरियंट या व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच २ टक्के म्हणजेच ७ नमुने हे ओमायक्रॉन या व्हेरियंटने व उर्वरित १ टक्के नमुने हे इतर व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. वयोगटानुसार २९७ रुग्णांपैकी ३५ टक्के म्हणजेच १०३ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. या खालोखाल २७ टक्के म्हणजेच ८० रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील तर २३ टक्के म्हणजेच ६८ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

  • लस न घेतलेले ८४ रुग्ण

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २९७ पैकी १९ रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तथापि, यापैकी कोणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही किंवा अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले नाही. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १९४ रुग्णांपैकी ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर दुसऱ्या एका रुग्णाला अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ८४ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

  • जिनोम सिक्वेन्सिंगचा फायदा

सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, कोविड विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिंग केल्यामुळे एकाच विषाणूच्या २ किंवा अधिक व्हेरियंट म्हणजेच प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.

हेही वाचा -Foreign Tourists In Goa : ओमायक्रॉनच्या धास्तीतच गोव्यात उतरले विदेशी पर्यटकांचे पहिले चार्टर्ड विमान

ABOUT THE AUTHOR

...view details