मुंबई -मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स यूनिटला ( AIU ) दोन परदेशी नागरिकांकडे तब्बल 247 कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. आरोपींकडे तब्बल 35 किलो हेरॉईन होते. याप्रकरणी एआययूने दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई विमानतळावर २४७ कोटींचे हेरॉईन ड्रग्ज जप्त विमानतळावर दोन व्यक्ती अशाप्रकारे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची गुपित माहिती डीआरआयला ( Directorate of Revenue Intelligence ) सूत्रांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -NCP Activist Arrested In Navi Mumbai : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक
विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या इतिहासात ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वात मोठी कारवाई आहे. दोन परदेशी नागरिकांना ड्रग्जची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. हेरॉईनच्या चार बॅग जप्त करण्यात आल्या ( heroin seized at Mumbai airport ) आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रग्जची खेप पुरविण्यासाठी मुंबईत आले होते. अटक करण्यात आलेले ड्रग्ज तस्कर हे झिम्बाब्वेचे नागरिक आहेत. ते पार्टीसाठी ड्रग्जचा सप्लाय करण्यासाठी आले होते. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. अटक केलेल्यांमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे आरोपी हरारे येथून निघाले होते. त्यांनी एडिस अबाबा येथून हेरॉईन घेतले होते. त्यानंतर ते मुंबईला आहे होते.
हेही वाचा -उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-काँग्रेसची युती..?