मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेला ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे ( Thane-Diva 5th and 6th railway line ) काम पुर्ण झाले आहे. बहुप्रतीक्षित या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल सेवा ( 34 AC locomotives ) आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) ( non-air-conditioned suburban services ) उपनगरीय सेवा वाढविण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी खुशखबर; शुक्रवारपासून ३४ एसी लोकल वाढणार, पंतप्रधानांच्या हस्ते नव्या मार्गिकेचे होणार उद्घाटन! - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर ३४ वातानुकूलित आणि दोन साधारण उपनगरीय सेवा वाढवण्यात येणार आहे. तसेच ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी होणार आहे.
३६ लोकल ट्रेन वाढणार -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास गर्दी मुक्त आणि अधिक वेगवान व आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून १८ फेब्रुवारी २०२२ रोजी ठाणे-दिवा पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाची रेल्वेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) मुख्य मार्गावर एकूण ३६ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. या ३६ लोकलपैकी ३४ वातानुकूलित लोकल सेवा आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) लोकल असणार आहे. विशेष म्हणजे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल ट्रेनची संख्य कमी करून त्या मुख्यमार्गावर चालविण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.