मुंबई - राज्य सरकारने वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. थकित वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी वीजबिलात सवलत देणारे निर्णय जाहीर केले आहेत.
- शेतकऱ्यांना उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च, २०२२ पर्यंत केल्यास त्यांना राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी देण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या जवळपास ६६ टक्के म्हणजे ३० हजार ४११ कोटी रुपये इतकी रक्कम माफ केली जाणार आहे.