महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CORONA VIRUS : राज्यात शनिवारी 3,276 नवे रुग्ण, 58 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाचे 3 हजार 276 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3 हजार 723 रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona update in Maharashtra
corona update in Maharashtra

By

Published : Sep 25, 2021, 8:36 PM IST

मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. आज शनिवारी 3 हजार 276 रुग्ण आढळून आले आहेत. 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3 हजार 723 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.24 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

37,984 सक्रिय रुग्ण -


आज राज्यात 3276 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 41 हजार 119 वर पोहचला आहे. तर आज 58 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 38 हजार 834 वर पोहचला आहे. आज 3 हजार 723 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 60 हजार 735 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.24 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 79 लाख 92 हजार 10 नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 119 नमुने म्हणजेच 11.28 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 59 हजार 120 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 37 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हे ही वाचा -राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार


रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -


26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा -धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले



या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 455
  • रायगड - 100
  • अहमदनगर - 658
  • पुणे - 393
  • पुणे पालिका - 172
  • पिंपरी चिंचवड पालिका - 116
  • सोलापूर- 184
  • सातारा - 170
  • सांगली - 66

ABOUT THE AUTHOR

...view details