मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आज (मंगळवार) कोरोनाच्या ३,२१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. या नव्या रुग्णांसह सध्या राज्यात ६२ हजार ८३३ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तसेच आज राज्यातील तबब्ल १,९२५ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९ हजार ६३१ झाली आहे. राज्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के इतके आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ स्वॅब नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार १४१ लोकांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमध्ये तर उर्वरित १७३ मृत्यू त्या अगोदरच्या कालावधीत झालेले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर ४.६९ टक्के इतका आहे.
मागील ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१, यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशा प्रकारे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा...'राज्यात कोरोना चाचण्या वाढवा, महापालिकांना भरघोस मदत करा'
राज्यातील जिल्हानिहाय कोरोना ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील...
- मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण - (६८,४१०), बरे झालेले रुग्ण- (३४,५७६), मृत्यू- (३८४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,९८२)
- ठाणे : कोरोनाबाधित रुग्ण - (२६,५०६), बरे झालेले रुग्ण- (१०,७६६), मृत्यू- (७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४,९८८)
- पालघर : कोरोनाबाधित रुग्ण - (३८६६), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६१९)
- रायगड : कोरोनाबाधित रुग्ण - (२७१४), बरे झालेले रुग्ण- (१७११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०८)
- रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्ण - (५०४), बरे झालेले रुग्ण- (३५२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९)
- सिंधुदुर्ग : कोरोनाबाधित रुग्ण - (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
- पुणे : कोरोनाबाधित रुग्ण - (१६,९०७), बरे झालेले रुग्ण- (९१४२), मृत्यू- (६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४१)
- सातारा : कोरोनाबाधित रुग्ण - (८६८), बरे झालेले रुग्ण- (६३२), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५)
- सांगली : कोरोनाबाधित रुग्ण - (३०२), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२१)
हेही वाचा...परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू होणार नाही - अजित पवार
- कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण - (७५०), बरे झालेले रुग्ण- (६९१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)
- सोलापूर : कोरोनाबाधित रुग्ण - (२३४५), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६०)
- नाशिक: कोरोनाबाधित रुग्ण - (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१६२०), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६६)
- अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्ण - (३००), बरे झालेले रुग्ण- (२२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
- जळगाव : कोरोनाबाधित रुग्ण - (२४७६), बरे झालेले रुग्ण- (१२६७), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२०)
- नंदूरबार : कोरोनाबाधित रुग्ण - (८९), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
- धुळे : कोरोनाबाधित रुग्ण - (५८७), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८)
- औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्ण - (३६८६), बरे झालेले रुग्ण- (१९८२), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०३)
- जालना : कोरोनाबाधित रुग्ण - (३९५), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२५)
- बीड : कोरोनाबाधित रुग्ण - (१०२), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
- लातूर : कोरोनाबाधित रुग्ण - (२२७), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)
- परभणी : कोरोनाबाधित रुग्ण - (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
- हिंगोली : कोरोनाबाधित रुग्ण - (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)
- नांदेड : कोरोनाबाधित रुग्ण - (२९५), बरे झालेले रुग्ण (१७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०६)
- उस्मानाबाद : कोरोनाबाधित रुग्ण - (१८३), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : स्वतःचं घरं केलंय क्वारंटाइन सेंटर, पिसादेवी गावातील तरुणाचा स्तुत्य उपक्रम
- अमरावती : कोरोनाबाधित रुग्ण - (४६३), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७)
- अकोला : कोरोनाबाधित रुग्ण - (१२७२), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७)
- वाशिम : कोरोनाबाधित रुग्ण - (७९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
- बुलढाणा : कोरोनाबाधित रुग्ण - (१७६), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
- यवतमाळ : कोरोनाबाधित रुग्ण - (२५१), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२)
- नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण - (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४२)
- वर्धा : कोरोनाबाधित रुग्ण - (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
- भंडारा : कोरोनाबाधित रुग्ण - (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
- गोंदिया : कोरोनाबाधित रुग्ण - (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
- चंद्रपूर : कोरोनाबाधित रुग्ण - (६०), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
- गडचिरोली : कोरोनाबाधित रुग्ण - (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
- इतर : कोरोनाबाधित रुग्ण - (११७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७)
राज्यात एकूण : कोरोनाबाधित रुग्ण रुग्ण-(१,३९,०१०), बरे झालेले रुग्ण- (६९,६३१), मृत्यू- (६५३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(६२,८३३)
हेही वाचा....शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार - गृहमंत्री
टीप - आज (मंगळवार) राज्यात एकूण नोंदवलेल्या २४८ कोरोना मृत्यूंपैकी ७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १७३ कोरोना मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५, सोलापूर ४२, औरंगाबाद – १५, ठाणे -१३, नाशिक -१८, जळगाव -७, अमरावती -१, बुलढाणा -१, कल्याण डोंबिवली -२, मालेगाव -१, मीरा भाईंदर -३, पिंपरी चिंचवड -१, रत्नागिरी -२, सांगली -१, सातारा -१, यांचा समावेश आहे.
हे १७३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखवता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय.सी.एम.आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.