मुंबई - हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या प्रत्येक जणांची कोरोना चाचणी केली ( corona tests during winter session ) जाते. पुढील आठवड्यात 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर असे दोन दिवस अधिवेशन ( winter session dates in MH ) चालणार आहे. पुढील आठवड्यासाठी अधिवेशनात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली असून चाचणी करणाऱ्यांपैकी 32 जणांचा रिपोर्ट हा करोना पॉझिटिव्ह आला आहे.
हिवाळी अधिवेशनात एकूण दोन हजार दोनशे जणांची कोरोना चाचणी ( corona tests in winter session 2021 ) करण्यात आली होती. त्यापैकी 32 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ( 32 peoples corona positive during winter session ) आला आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्यामध्ये सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी व पत्रकार यांचा समावेश आहे. मात्र ,अद्याप कोणत्याही मंत्री किंवा आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या आधी भाजपचे आमदार समीर मेघे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ( BJP MLA Samir Meghe corona positive ) आला होता.