मुंबई -राज्यात कोरोना व्हायरस संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान लॉकडाऊन, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. कर्तव्य बजावताना गेल्या 24 तासात 303 पोलीस कोरोनाबाधित झाले असून, 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 136 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 12 पोलीस अधिकारी तसेच 122 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 13,180 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, यामध्ये 1387 पोलीस अधिकारी तर 11,793 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2389 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 313 पोलीस अधिकारी तर 2076 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 10655 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 1060 पोलीस अधिकारी तर 9595 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 231580 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 335 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 890 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. राज्यात , अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 33 हजार 632 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
धक्कादायक; राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू, तर 303 पोलीस कोरोनाग्रस्त - कर्तव्य बजावताना पोलिसांना कोरोना
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र कर्तव्य बजावताना गेल्या 24 तासात 303 पोलीस कोरोना बाधित झाले असून, 5 पोलिसांचा मृत्यू झाला.

पोलीस
आतापर्यंत पोलिसांनी 95927 वाहने जप्त केली असून तब्बल 21 कोटी 76ब लाख 67 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे .राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 69 घटना घडलेल्या आहेत.