महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती? साकीनाकामध्ये महिलेवर पाशवी बलात्कार, एकास अटक - पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी

साकी नाका परिसरातील खैराणी रोडवर 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

30-year-old woman raped in Mumbai
मुंबईत साकी नाका परिसरात महिलेवर बलात्कार

By

Published : Sep 10, 2021, 6:25 PM IST

Updated : Sep 10, 2021, 7:48 PM IST

मुंबई -मुंबईत साकीनाका येथील खैराणी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले आहे. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईत साकी नाका परिसरात महिलेवर बलात्कार

महिलेवर बलात्कार -

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असा अहवाल यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

एकाला अटक-
या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

Last Updated : Sep 10, 2021, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details