मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २५८३, मंगळवारी ३१३१, बुधवारी ३६०८ रुग्ण आढळून आले. आज गुरुवारी २३ सप्टेंबरला त्यात किंचित घट होऊन ३३२० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१ मृत्यूंची नोंद झाली असून ४०५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -एक प्रभाग एक सदस्य, मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेलाच फायदा
राज्यात ३९,१९१ सक्रिय रुग्ण
राज्यात आज दिवसभरात ४०५० रुग्ण बरे होऊन घरी गेले, त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ५३ हजार ०७९ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३३२० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ७२५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३४ हजार ५५७ (११.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ८४२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ३९ हजार १९१ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -