मुंबई -हैद्राबादमधून लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक (Lashkar e Toiba terrorists arrest Hyderabad) करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या रॅली आणि राजकीय पक्षांचे मेळावे टार्गेट (Mumbai Dussehra Rally Terrorist Target) करून बॉम्बफेक करण्याचा कट त्यांचा उघड झाला आहे. आरएसएस आणि भाजपाच्या बैठकांना लक्ष्य करण्याचाही कट (RSS BJP Terrorist Target) उघड झाला आहे. दसऱ्यादरम्यान होणारे सर्व मेळावे या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. हे तिघेही दहशतवादी तेलंगणाचे रहिवाशी आहेत. (Mumbai Crime)
हँडग्रेनेड आणि लाखाेंची रक्कम जप्त-जाहेद, हसन फारूख आणि मोहम्मद समीमुद्दीनच्या अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. दहशतवादी हल्ले आणि दंगली घडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट बनवल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तानात बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरीसोबत ते संपर्कात होते. भारतातील गर्दीच्या ठिकाणी हँडग्रेनेडने हल्ला करून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा कट होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने यूएपीए कायद्यातंर्गत फरहतुल्ला गौरीला दहशतवादी घोषित केले आहे. गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनुसार, फरहतुल्ला गौरी उर्फ अबू सुफियान आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा प्रमुख म्होरक्या आहे. हैदराबादमध्ये जाहेद, हसन फारूख आणि मो. समीमुद्दीन यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा फरहतुल्लाचं नाव समोर आले. पोलिसांनी या ३ दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये पकडलं. त्यांच्याकडून ४ हँडग्रेनेड आणि ५ लाख ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले. फरहतुल्लाच्या आदेशावरून गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट आखली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.