महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वेने राज्य अंतर्गत 12 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द केलेले आहे.

file photo
file photo

By

Published : Apr 15, 2021, 6:03 PM IST

मुंबई - दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी शेकडो विशेष गाडी चालवण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वेने राज्यांतर्गत 12 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.

या गाड्या केल्या रद्द

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही गाड्या रद्द केल्या आहेत. ट्रेन क्रमांक 01139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विशेष एक्स्प्रेस 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2021पर्यंत रद्द केली आहे. ट्रेन क्रमांक 01140 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेस 16 एप्रिल ते 1 में 2021पर्यंत रद्द राहतील.

पुणे नागपूर विशेष गाड्या रद्द

ट्रेन क्रमांक 02041 पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 15 एप्रिल ते 29 एप्रिल 2021पर्यंत रद्द करण्यात आल्या. तर ट्रेन क्रमांक 02042 नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2021पर्यंत रद्द राहतील. ट्रेन क्रमांक 02239 पुणे-अजनी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 17 एप्रिल ते 1 में 2021पर्यंत रद्द राहतील. ट्रेन क्रमांक 02240 अजनी-पुणे विशेषच्या फे-या 18 एप्रिल 2021 ते 2 में 2021पर्यंत रद्द राहतील. ट्रेन क्रमांक 02036 नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 17 एप्रिल ते 1 में 2021पर्यंत रद्द असणार आहेत तर ट्रेन क्रमांक 02035 पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 15 एप्रिल 2021 ते 29 एप्रिल 2021 पर्यंत रद्द करण्यात आलेला आहेत.

पुणे- अमरावती विशेष गाड्या रद्द

ट्रेन क्रमांक 02117 पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 21 एप्रिल 2021 ते 28 एप्रिल 2021पर्यंत रद्द राहतील. तर ट्रेन क्रमांक 02118 अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 22 एप्रिल 2021 ते 29 एप्रिल 2021पर्यंत रद्द करण्यात आलेला आहेत.

नागपूर- अहमदाबाद गाड्या रद्द

ट्रेन क्रमांक 01137 नागपूर-अहमदाबाद विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 21 एप्रिल ते 28 एप्रिल 2021पर्यंत रद्द राहतील. ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 22 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. ट्रेन क्रमांक 02223 पुणे-अजनी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या 23 एप्रिल ते 30एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details