मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या Bmc Hospitals केईएम KEM नायर NAIR सायन SION रुग्णालयांत मोफत उपचार Free treatment तसेच कमी दरांत होणाऱ्या चाचण्यांयामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालिका रुग्णालयांवर असलेला ताण पाहता केईएम KEM नायर NAIR सायन SION या तीन्ही मोठ्या रुग्णालयांत असलेल्या रेडिओलॉजी विभागात Department of Radiology तपासणीसाठी ३ महिन्यांची तारीख 3 Months Waiting For Mri दिली जात आहे. यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचे Delay In Treatment समोर आले आहे. महानगरपालिकेची केईएम सायन आणि नायर ही तीन महत्वाची व मोठी रुग्णालये आहेत. रुग्णालयांत रोज हजारो तर वर्षाला लाखो रुग्ण उपचार घेतात. मुंबईमधील विशेष करून मध्यमवर्गिय व गरीब रुग्णांची गर्दी रुग्णालयांत असते.
एमआरआयसाठी 3 महिने वेटींग3 Months Waiting For Mri पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिओलॉजी विभागात Department of Radiology एमआरआय MRI करण्यासाठी २ मशीन आहेत. त्यापैकी एक एमर्जन्सीसाठी तर दुसरी बाह्य रुग्णांसाठी राखीव आहे. येथे एमआयआर करण्यासाठी ३ महिन्यांची तारीख दिली जाते. केईएम रुग्णालयात १ मशीन आहे. २४ तासांपैकी २ तास ही मशीन बंद असते. एका दिवसात ३५ ते ३८ रुग्णाच्या चाचण्या केल्या जातात. यामुळे ३ महिन्यांची तारीख दिली जाते. अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी दिली. नायर रुग्णालयात दीड ते दोन महिन्यांची तारीख दिली जाते. तातडीची गरज असल्यास आठवडाभरात एमआरआय केला जातो. एमआरआय चाचणी वेळेवर होत नसल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत.