मुंबई - मुंबईमध्ये १३ ते १८ जून हे सलग आठ दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या भरती दरम्यान नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले. यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात गेलेले ३ युवक जुहू चौपाटीवर बुडाले आहेत. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील जुहू बीचवर 3 तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाची शोधमोहीम सध्या सुरूच आहे. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी गेल्याने हा अपघात झाला आहे. सध्या शोध आणि बचावकार्य सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
३ जण बुडाले - जुहू चौपाटी येथील जे डब्लू मेरियट हॉटेल जवळील समुद्रात सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान तीन युवक बुडाले. याची माहिती मनोहर शेट्टी या लाईफ गार्डकडून माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाकडून शोध मोहीम राबवली जात आहे. युवकांच्या शोध घेण्यासाठी नेव्हीच्या डायव्हर्सची मदत घेतली जात आहे. अमन सिंग २१ वर्षे, कौस्तुभ गुप्ता १८ वर्षे, प्रथम गुप्ता १६ वर्षे अशी या बुडालेल्या युवकांची नावे आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
समुद्राला मोठी भरती -मुंबई महापालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तब्बल २२ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात १३ ते १८ जून असे एकूण सहा दिवस मोठी भरती येणार आहे. त्यापैकी गुरुवारी १६ जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून लाटांची उंची ४.८७ मीटर असणार आहे. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्र किनारी ( Tourists not go to beach) जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगर महापालिकेने केले आहे.