ST Workers Strike : आज २९३ एसटी कर्मचाऱ्यांना केले निलंबित तर २३८ कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस ! - एसटी कर्मचाऱ्यांवर महामंडळाची कारवाई
एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike )पुकारला आहे. आज एसटी महामंडळाने २३८ रोजंदार एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. तर, २९३ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई -गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्याएसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike )अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. आज एसटी महामंडळाने २३८ रोजंदार एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. तर, २९३ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा अडीच हजारांवर गेला आहे. त्यामुळे कर्मचारी एसटी महामंडळाविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.
२९३ कर्मचारी निलंबित -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल २२ दिवस होऊन सुद्धा एसटीचा संप (ST Workers Strike) सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २ हजार ५३ एसटी कर्मचाऱ्यांनावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता याच पाठोपाठ एसटी महामंडळात गेल्या काही दिवसापासून रोजदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. आज एसटी महामंडळाने २३८ रोजंदार एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. तर २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ७७६ इतकी झाली आहे.
सात हजारापेक्षा जास्त कर्मचारी कर्तव्यावर हजर -
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे (ST Workers Strike ) एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळ कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे वारंवार आवाहन करत आहे. मात्र, कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली. या कारवाईच्या धास्तीने आता कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज राज्यभरात सात हजार पेक्षा जास्त कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. तसेच आज २९ मार्गावर १३१ बसेस धावल्या असून ३ हजार ५१७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.