महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर - विजय वडेट्टीवार - ओबीसी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत.

OBC SCHOLARSHIP
OBC SCHOLARSHIP

By

Published : Oct 30, 2021, 4:35 AM IST

मुंबई -ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केली.

महाडीबिडी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार रक्कम -

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील दहावी पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली ही रक्कम महाडीबिडी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी रुपये ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यास सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा -पोपटाचा धंदा माझा नाही नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री


राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये मंजूर झाल्याने विद्यार्थी स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details