मुंबई - मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई केली जात ( Mumbai Drain Cleaning ) आहे. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. नालेसफाई झाल्याचा दावाही पालिका प्रशासनाकडून केला जातो. त्यानंतरही पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते. यामुळे नालेसफाईवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केला जातो.
नालेसफाईवर आरोप -मुंबई महापालिकेकडून मागील वर्षी नालेसफाईवर 130 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर या वर्षी 162 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मागील वर्षी 130 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईत पाणी साचले होते. हिंदमाता, किंग सर्कल, सायन, मिलन सब वे आदी ठिकाणी मुंबईत दरवर्षी पाणी साचते. गेल्या वर्षी मुंबई शहर विभागातही पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळीही राजकीय पक्षांनी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
अधिक गाळ काढला -मुंबईत यंदा पालिकेची मुदत संपल्याने उशिराने नालेसफाईची कामे सुरू झाली. नालेसफाई संथगतीने सुरू असल्याने दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे तसेच जास्त मशिनरी लावण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईत 9 लाख 10 हजार 318 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. 30 मे ला 100 टक्के नालेसफाई झाली आहे. आतापर्यंत पालिकेने 9 लाख 59 हजार 896 म्हणजेच 105 टक्के गाळ काढला आहे. नालेसफाईचे काम पारदर्शक पद्धतीने केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Mumbai Drain Cleaning : नालेसफाईवर दोन वर्षात 292 कोटी खर्च, तरीही मुंबईची तुंबई - मुंबई नालेसफाई मराठी बातमी
मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई केली ( Mumbai Drain Cleaning ) जात आहे. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते.
Mumbai Drain Cleaning