मुंबई -अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. नालेसफाई, पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हरहेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहेत. याशिवाय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९१ उच्च वॅटेज पंप बसविणार आहे.
पावसाचे पाणी उपसण्यासाठी रेल्वे मार्गावर २९१ उच्च वॅटेज पंप बसविणार - pumping rain water in Mumbai
मुंबईत मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. नालेसफाई, पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हरहेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहेत. याशिवाय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९१ उच्च वॅटेज पंप बसविणार आहे.
149 उच्च वॅटेज पंप बसविणार -मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर 19 असुरक्षित ठिकाणी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक उच्च वॅटेज पंप बसविण्यात येणार आहेत. मध्यरेल्वेने अतिवृष्टीदरम्यान पाणी साचणारी 19 संवेदनशील ठिकाणे निवडणली आहेत. या ठिकाणी 83 पंप देण्याची योजना आहे. यावर्षी एकूण 149 पंप दिले जाणार आहेत. त्यापैकी रेल्वे 118 पंप आणि बृहन्मुंबई महानगरपालिका उर्वरित 31 पंप पुरवणार आहे. यावर्षी पूर येऊ नये म्हणून पूरप्रवण ठिकाणी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या वाढवण्यात आली. मेन लाईनवर मस्जीद बंदर, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर ही ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत.
पश्चिम रेल्वेवर १४२ बसविणार पंप -पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात पाणी साचते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे. यंदा पश्चिम रेल्वेचा उपनगरीय लोकल मार्गावर १४२ उच्च वॅटेज पंप बसविण्यात येणार आहे.
हेही वाचा - Maharashtra rainfall : राज्यात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याची शक्यता - डॉ. रामचंद्र साबळे