मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. काही भागात तापमान चाळीस अंशांच्यावर गेले आहे. उष्माघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण यामुळे वाढले असून राज्यात उष्माघाताच्या २९ संशयितांचा बळी गेले ( 29 heatstroke suspects killed in state ) आहेत. तर मागील अकरा दिवसात सहा जण दगावल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
तापमान ४० - ४५ अंशापर्यंत -राज्यात काही भागात अवकाळी पाऊस होत असला तरी उष्णतेचे प्रमाण मात्र वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात उष्णतेची दाहकता जाणवते. उष्णता वाढल्याने उष्माघाताने होणारे मृत्यूही वाढले आहेत. १० मे पर्यंत राज्यात एकाही उष्माघाताच्या बळीची नोंद नव्हती. मात्र ११ मे ते २१ मे दरम्यान सुमारे सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने, मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे. सध्या वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उर्वरित भागात तापमान ४० ते ४५ अंशपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.