मुंबई - मध्य रेल्वेचे भिवंडी रोड स्टेशन मुंबई विभागातील सर्वात यशस्वी व्यवसाय विकास घटक म्हणून उदयास आले आहे. व्यवसाय विकास घटकाने सुरू केलेल्या पार्सल सेवेतून (बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट) 17 फेऱ्यांमधून 2676 टन इतके विक्रमी पार्सल रवाना करण्यात आले आहे.
10 सप्टेंबर पासून भिवंडी स्थानकातून पहिले पार्सल सेवा सुरू झाली. पहिल्या पार्सल ट्रेनने 3,878 पॅकेजेस मधून 86.85 टन पाठविण्यात आले. ते आतापर्यंत भिवंडी रोड स्टेशन ते शालिमार, गुवाहाटी, पाटणा आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या पार्सल गाड्यांच्या 17 फेऱ्यांमधून 1.74 लाख पॅकेजेसच्या माध्यमातून एकूण 2,676 टन पार्सल पाठविले गेले. 18 नोव्हेंबर रोजी आझरा, गुवाहाटीला जाणाऱ्या पार्सल ट्रेनमधून 24,941 पॅकेजेस मधून 343 टन पार्सलसह सर्वाधिक लोडिंग झाले आहे.
1.74 लाख पॅकेजेस पाठविले
भिवंडी रोड स्थानकावरून आजपर्यंत 2676 टन वजनाच्या एकूण 1.74 लाख पॅकेजेस पाठविण्यात आल्या आहेत. ज्यात लोकप्रिय ब्रँडचे जसे की गोदरेज, ओनिडा, एलजी, बजाज, पार्ले-जी, हिंदुस्तान लीव्हर, डेल-मोंटे, मिल्टन इत्यादींचे फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे.
उद्योगाला अखंड आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी
क्षेत्रिय आणि विभागीय स्तरावर रेल्वेने उभारलेल्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू)चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने उद्योगाला अखंड आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी देऊन फ्रेट आणि पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी खूप पुढाकार घेतला आहे. भिवंडी रोड स्थानक वस्तू आणि पार्सलसाठी सुरू करणे हा बीडीयूने रेल्वेच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर पार्सल मालगाड्या व वस्तूंच्या गाड्या हाताळण्यासाठी नवीन पार्सल व वस्तूंचे शेड उघडण्यात आले. या उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
उत्तर-दक्षिण रेल्वे वाहतुकीचा जोडणारा बिंदू