मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या 26 हाय रिस्क लोकांची कोरोना टेस्ट केली असता, ते सर्व जण निगेटिव्ह आले आहेत. तर इतर 28 लो रिस्क असलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बच्चन कुटूंबीयांच्या संपर्कात असलेले 26 जण कोरोना 'निगेटिव्ह' - बच्चन फॅमिली कोरोना न्यूज
शनिवारी महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. अमिताभ आणि अभिषेक दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले.
शनिवारी महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. अमिताभ आणि अभिषेक दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या कुटूंबातील जया, ऐश्वर्या आणि आराध्या यांचीही टेस्ट केली असता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी पॉझिटिव्ह आल्या. त्या दोघींना लक्षणे नसल्याने त्यांच्या राहत्या जलसा बंगल्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे. बच्चन कुटूंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे चार बंगले पालिकेने औषध फवारणी करत सिल केले आहेत. तसेच बच्चन कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या 26 हाय रिस्क लोकांची कोरोना टेस्ट केली असता या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बच्चन कुटूंबीयांच्या संपर्कात आलेल्या 28 लो रिस्क लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये अभिषेक बच्चन शूटिंगसाठी गेले असता त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही समावेश आहे.