मुंबई -मुंबईत कांदळवनाचा मोठा परिसर आहे. मात्र, या ठिकाणी खारफुटीची झाड असुरक्षित आहे. अनेक ठिकाणी झाडे तोडून अनधिकृत बांधकाम देखील होत आहे. खारफुटीची झाडे मुंबईसाठी महत्वाची आहेत. यामुळे खारफुटींच्या संरक्षणासाठी 250 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने खारफुटीसह फ्लेमिंगो पक्षांनाही संरक्षण मिळणार आहे.
माहिती देताना वनशक्ती एनजीओचे संचालक स्टॅलिन दयानंद हेही वाचा -वाढदिवस भावाचा, जल्लोष गावाचा : 550 केक कापून बर्थ डे बॉयने दाखवला जलवा
तीन प्रकारचे कॅमेरे असणार
मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये खारफुटी झाडांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे या परिसरामध्ये सात समुद्र पार करून फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी येत असतात. यामुळे निसर्ग अधिक खुलून येते. मात्र अलीकडे खारफुटीची तोड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे सर्व रोखण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये मुंबई शहरात 70, मुंबई उपनगरात 70, ठाण्यामध्ये 40, भिवंडीमध्ये 30, नवी मुंबईत 40 यामध्येही तीन प्रकारचे कॅमेरे असणार आहेत. या परीसरातील प्रत्येक हालचालींची नोंद व्हावी यासाठी तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.
एक चांगले पाऊल
मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये वनविभागाकडून अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईचा समावेश आहे. निसर्गाची सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे एक चांगले पाऊल असल्याचे निसर्गप्रेमींचे मत आहे. सीसीटीव्हीमुळे खारफुटींवर होणारी आक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे आता थांबली जातील, अशी आशा असल्याचे वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन डी यांनी सांगितले.
समाजकंटकांनी मागील वर्षी लॉकडाऊनचा घेतला होता फायदा
मागील वर्षी लॉकडाऊनचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी खारफुटी झाडांची कत्तल करण्यात आली होती. अनेक प्रकरणे समोर आली होती. ठाणे शहराला लागून असलेल्या मुंब्रा आणि दिवा शहराला जोडणारा मुंब्रा चूहा पूल ते दिवा येथील साबेगावपर्यंत दोन किलोमीटर लांबीचा रस्ता खारफुटी कापून भूमाफियांनी तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खारफुटी झाडाचे फायदे
खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. समुद्र लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप ही खारफुटी थांबवते. कांदळवनामुळे समुद्रातील अन्नसाखळी टिकून राहते. हे इतके उपयुक्त आहे कीु त्सुनामीचा तडाखाही ते सक्षमपणे सहन करू शकतात.
मुंबईत किती हेक्टर आहे कांदळवन क्षेत्र?
भारतीय वनसर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या ६,६०० हेक्टर कांदळवनक्षेत्र आहे. त्यापैकी २७६ हेक्टर हे मुंबई शहराच्या हद्दीत असून ते राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. मुंबई उपनगरामध्ये ३,९४८.४ हेक्टर राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले असले, तरी त्यातील ३,७०६.४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित २४२ हेक्टर क्षेत्र मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या मालकीचे आहे. वन विभागाने १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील (अंधेरी - बोरिवली) १,३८६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सोबतच ठाणे महापालिकेच्या ताब्यातील ३५०.५१ हेक्टर आणि मीरा - भाईंदर पालिकेच्या ताब्यातील १०३६.८८ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन 'कलम ४' अंतर्गत राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
हेही वाचा -माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती