मुंबई मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील 25 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर झाले 25 witnesses turns hostile in Malegaon blast आहेत. आज उपस्थित साक्षीदाराने आरोपी क्रमांक 9 कर्नल पुरोहित यांच्या संबंधित साक्ष नोंदवण्याकरिता न्यायालयात आले असता एनआयएला साक्ष दिली नसल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आल्यानंतर साक्षीदार फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला Malegaon blast witnesses turns hostile आहे.
कुठल्याही प्रकारची साक्ष नाही या प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित आज एनआयए न्यायालयामध्ये साक्षीदार क्रमांक 265 उपस्थित करण्यात आला होता साक्षीदाराने न्यायालयासमोर असे सांगितले की मी कुठल्याही प्रकारची साक्ष तपास यंत्रणेला दिलेली नाही आहे तपास एजन्सीने माझी यासंदर्भात विचारपूस पंधरा मिनिटं केली होती मात्र त्यावेळी कुठल्याही कागदावर तथा जबाबावर स्वाक्षरी घेतली नव्हती मी कर्नल पुरोहित यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी फक्त त्यांच्या घरी एक वेळा गेलो होतो त्यानंतर माझा आणि पूर्वी त्यांचा कुठलेही भेट किंवा संभाषण झालेले नाही आहे अशी साक्ष आज कोर्टासमोर साक्षीदाराने नोंदवल्यानंतर फितूर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
19 जणांनी साक्ष बदललीदेशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 19 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.
काय आहे प्रकरण 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर निवृत्त रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. 25 witnesses turns hostile in Malegaon blast case
हेही वाचाAnil Parab Resort अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, किरीट सोमैयांची माहिती