मुंबई -मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असतानाच फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र त्यापैकी ८७ ते ९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने हॉस्पिटल आणि जंबो कोविड सेंटमधील बेड अद्यापही रिक्त आहेत. मुंबईमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये १६ हजार ५६१ पैकी २४ टक्के म्हणजेच तब्बल ३९३३ खाटा रिक्त आहेत. मुंबईत आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ८७ ते ते ९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने रुग्णालयातील आणि कोविड सेंटरमधील खाटा रिक्त आहेत.
२४ टक्के खाटा रिकाम्या -
मुंबईत रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून डिसीएचसी व सीसीसी २ जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये १६ हजार ५६१ खाटा आहेत. त्यापैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत. जम्बो कोव्हीड सेंटरमधील सुमारे ७६ टक्के खाटा भरलेल्या आहेत. तर ३,९३३ खाटा म्हणजेच २४ टक्के खाटा रिक्त आहेत. कोविड सेंटरमधील डिसीएचसी या प्रकारात गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी ५,६२४ खाटा आहेत. त्यापैकी ४,२९३ म्हणजेच ७६ टक्के खाटा भरलेल्या असून १ हजार ३३१ म्हणजेच २४ टक्के खाटा रिक्त आहेत. डिसीएचमध्ये गंभीर आजार नसलेल्या रुग्णांसाठी ७४८६ खाटा आहेत. त्यापैकी ५७६८ म्हणजेच ७७ टक्के खाटा भरलेल्या असून १७१८ म्हणजेच २३ टक्के खाटा रिक्त आहेत. तर सीसीसी २ मध्ये ३४५१ खाटा असून त्यापैकी २५६७ म्हणजेच ७४ टक्के खाटा भरलेल्या असून ८८४ म्हणजेच २४ टक्के खाटा रिक्त आहेत.
रुग्णालयातील खाटा रिक्त -
पालिका सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये १३ हजार ११० खाटा आहेत. त्यापैकी १० हजार ०६१ खाटांवर रुग्ण आहेत. तर ३ हजार ०४९ खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या १६२७ खाटा आहेत. त्यापैकी १ हजार ३०३ खाटांवर रुग्ण असून ३२४ खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या ८ हजार ९१४ खाटा आहेत. त्यापैकी ६ हजार ६९५ खाटांवर रुग्ण असून २ हजार २१९ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरचे १ हजार बेड असून त्यापैकी ८३० बेडवर रुग्ण असून १७० बेड रिक्त आहेत.
हेही वाचा -कामाच्या ठिकाणी महिला संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल, टास्क फोर्स नेमणार
जम्बो सेंटरमध्ये ९ हजार बेड -