महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Western Railway : नव्या वर्षात पश्चिम रेल्वे साकारणार आणखी २३ सरकते जिने, तर २० पादचरी पूल उभारणार! - मुंबई पश्चिम लोकल प्रवास

पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात ( Western Railway in Mumbai Division ) २०२२ पर्यत १४ स्थानकांवर २३ सरकते जिने ( 23 Sliding Stairs at 14 Stations ) बसविण्यात येणार आहेत. तर, १६ स्थानकांत २० पादचारी पूल ( 20 Pedestrian Bridges at 6 Stations ) उभारण्यात येणार आहेत.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

By

Published : Dec 19, 2021, 8:24 PM IST

मुंबई -रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मपर्यत जाण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात ( Western Railway in Mumbai Division ) २०२२ पर्यत १४ स्थानकांवर २३ सरकते जिने ( 23 Sliding Stairs at 14 Stations ) बसविण्यात येणार आहेत. तर, १६ स्थानकांत २० पादचारी पूल ( 20 Pedestrian Bridges at 6 Stations ) उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सरकत्या जिन्यांची संख्या ९० वर पोहोचणार आहेत.

  • पश्चिम रेल्वेकडून प्रवासी सुविधेवर भर

एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सावध भुमिका घेत उपनगरीय रेल्वे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध स्थानकात मोठ्या प्रमाणात सरकरते जिने आणि पादचरी पुलाची उभारणी करण्यात येत आहे. तरीसुद्धा प्रवासी जिने टाळण्यासाठी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडतात. गर्दीच्या वेळी पादचारी पुलावर जाण्याऐवजी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पादचरी पुलावरची गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात २०२२ पर्यत १४ स्थानकांवर २३ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर, १६ स्थानकांत २० पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.

  • 'या' ठिकाणी बसवणार सरकते जिने

येत्या वर्षभरात पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील १४ स्थानकांवर २३ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. ज्यामध्ये मरिन लाइन्समध्ये एक, मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर तीन, महालक्ष्मी स्थानकात एक, वांद्रे स्थानकात तीन, वांद्रे टर्मिनसवर तीन, सांताक्रुझ स्थानकात एक, जोगेश्वरीत दोन, गोरेगाव, मालाड, कांदिवली व बोरिवली, नायगाव स्थानकात प्रत्येकी एक, बोईसर स्थानकात दोन आणि विरार स्थानकांत दोन जिने बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • 'या' ठिकाणी उभारणार पादचरी पूल

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ११४ पादचारी पूल असून येत्या वर्षभरात आणखी २० पादचारी पुलांचे नियोजन आहे. यामध्ये आठ पुलांचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरमध्ये वांद्रे आणि विलेपार्ले स्थानकात प्रत्येकी एक, जानेवारीत विलेपार्ले स्थानक, फेब्रुवारीत चर्नी रोड, सांताक्रुझ आणि दहिसर स्थानकात प्रत्येकी एक, मार्चमध्ये ग्रॅन्ट रोड स्थानकात एक, अंधेरीत दोन, भाईंदरमध्ये एक, बोईसरमध्ये एक पादचारी पूल होणार आहे.

हेही वाचा -अबब.. 80 लाख रुपये किंमत अन् तब्बल दीड टन वजनाचा 'गजेंद्र' रेडा..

ABOUT THE AUTHOR

...view details