मुंबई - राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज (शनिवार) किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन २२५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७,४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
७ हजार ४६७ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज (शनिवार) ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,९५९ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ७९१ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७६ हजार ७५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यू संख्या वाढली-