महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महावितरणकडून २२३३९ मेगावॅट वीजपुरवठा - महावितरणकडून २२३३९ मेगावॅट वीजपुरवठा

मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात आणि महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल २२ हजार ३३९ मेगावॅट वीजेचा पुरवठा केला.

22339-mw-power-supply-from-msedcl
महावितरणकडून २२३३९ मेगावॅट वीजपुरवठा

By

Published : Mar 13, 2021, 2:56 AM IST

मुंबई - मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात आणि महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल २२ हजार ३३९ मेगावॅट वीजेचा पुरवठा केला. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चोख नियोजनातून उच्चांक गाठल्याचा दावा ऊर्जा विभागाने केला आहे.

अखंडित वीज पुरवठा-

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कृषिपंपाद्वारेही विजेचा वापर वाढला असून गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. महावितरणने आतापर्यंत २१ हजार ५७० मेगावॉट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मात्र, महावितरणाने हा विक्रम मंगळवारी मोडीत काढला. महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएल - ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॉट वीज उपलब्ध झाली.

सौर ऊर्जेद्वारे १९७४ मेगावॉटसह नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२ मेगावॉट वीज यातून उपलब्ध झाली. तसेच कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४० मेगावॉट तर पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीज निर्मिती स्त्रोताद्वारे १२५८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. तसेच मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरण कडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा केला आहे, असे ऊर्जा विभागाने स्पष्ट केले.

महावितरणाच्या कामगिरीचे कौतुक-

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यात आली. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

हेही वाचा-कोरोना निर्बंधासाठी प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश; मुख्य सचिवांनी घेतला राज्यातील जिल्ह्यांचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details