महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२ हजार ८४ नवे रुग्ण; ३९१ मृत्यू - महाराष्ट्र कोविड 19 बातमी

राज्यात एकूण २ लाख ५१ हजार ५६६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २९ हजार ११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८१ टक्के एवढा आहे.

corona
कोरोना

By

Published : Sep 12, 2020, 10:07 PM IST

Updated : Sep 12, 2020, 10:32 PM IST

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात २२ हजार ८४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १० लाख १५ हजार ६८१ झाली आहे. राज्यात शनिवारी ३९१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -..तर खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - उदय सामंत

राज्यात एकूण २ लाख ५१ हजार ५६६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २९ हजार ११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८१ टक्के एवढा आहे.

राज्यात शनिवारी १३ हजार ४८९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण बरे झाले असून, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ टक्के आहे.

हेही वाचा -खुशखबर... अंतिम वर्ष परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी

Last Updated : Sep 12, 2020, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details