महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mulund Crime : सुन्न करणारी घटना! आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न - आईची हत्या

तरुणाने केवळ मालमत्तेसाठी आईचा खून (Murder of mother for property) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मुलुंड येथील वर्धमान नगर परिसरात घटना घडली आहे. 22 वर्षीय मुलाने आपल्या 46 वर्षीय आईची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करून मुलाने लोकल ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide at local train) केल्याची घटना घडली आहे.

आईची हत्या
आईची हत्या

By

Published : Jul 10, 2022, 12:17 PM IST

Updated : Jul 10, 2022, 2:33 PM IST

मुंबई : मुंबई- 22 वर्षीय मुलाने आपल्या 46 वर्षीय आईची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या (Mother death ) केली. ही घटना 9 जून रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास मुलुंड येथील वर्धमान नगर परिसरात घडली ( Mulund Crime News ) आहे. छाया पांचाळ (वय 46 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे आहे.

मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न करताना

वर्धमान परिसरातून शनिवारी सायंकाळी मालाड पोलिसांना फोन आला. एका रूममधून रक्त बाहेर येत असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले होते. त्यानंतर मालाड पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना घरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत महिला दिसली. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी महिलेला मृत्यू घोषित केले. या घटनेची माहिती महिलेच्या पतीला देण्यात आली. घराची झडती घेतली असता पोलिसांना एक चिट्ठी बाथरूममध्ये सापडली. चाकूदेखील बाथरूममधील बेसिनमध्ये सापडला. पोलिसांनी मृत्यू महिलेच्या पतीला चिठ्ठीवरील हस्ताक्षर दाखवले. त्यावेळी हे हस्ताक्षर मुलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणानेच महिलेचे हत्या केली असावी- पोलिसांनी शोध सुरू केला असता मुलाने लोकलमधून उडी मारून आत्महत्या (Attempted suicide a local train) करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. त्यावरून पोलिसांना संशय आला की तरुणानेच महिलेचे हत्या केली असावी. सध्या तरुणावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मृत्यू महिलेच्या पतीकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुण आणि त्याची आई वडीलोपार्जित मालमत्तेवरून नैराश्यामध्ये होते असे सांगण्यात आले. तर मालाड पोलिसांकडून ( Malad Police ) आरोपी मुलाविरोधात खुनाचागुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Jul 10, 2022, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details