महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत 217 नवे रुग्ण, 4 रुग्णांचा मृत्यू - कोरोनाग्रस्तांचा आकडा

मुंबईत आज (रविवारी) 217 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2 हजार 658 दिवस इतका आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Nov 28, 2021, 10:13 PM IST

मुंबई- मुंबईत आज (रविवारी) 217 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2 हजार 658 दिवस इतका आहे.

एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 62 हजार 616 -

आज (दि. 28) 217 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 62 हजार 616 वर पोहोचला आहे. आज 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 16 हजार 330 मृत्यूंची नोंद झाली आहे. 247 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 500 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के -

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 2 हजार 658 दिवस इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आज 33 हजार 462 चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या पावणे दोन वर्षात एकूण 1 कोटी 23 लाख 69 हजार 732 चाचण्या करण्यात आल्या आहेत. झोपडपट्टीत रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. तर इमारतींमध्ये रुग्ण आढळून येत असल्याने 18 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा -Corona Update : राज्यात रविवारी 832 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details