ठाणे: अत्यावश्यक सेवा वगळता, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ९३२ वाहनांवर ठाणे वाहतूक विभीगाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील हद्दीत वाहतूक विभागाच्या १८ विविध विभागाने १५ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान ९३२ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर २०७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईत दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
ठाणे वाहतूक विभागाच्या १८ वाहतूक कार्यालयाद्वारे केलेल्या कारवाईत १३४ दुचाकी, ९४ तीनचाकी आणि १६ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
ठाणे नगर वाहतूक विभागाने - ६ दुचाकी , तीनचाकी - २७, चारचाकी - १,
कोपरी वाहतूक विभाग - ६ दुचाकी,
नौपाडा वाहतूक विभाग - ७ दुचाकी, तीनचाकी - १,
वागळे वाहतूक विभाग - ८ दुचाकी, तीनचाकी - १५,
कापूरबावडी वाहतूक विभाग - १४ दुचाकी, तीनचाकी - ४,
कासारवडवली वाहतूक विभाग - ६ दुचाकी, तीनचाकी - १२ तर चारचाकी - ६,
राबोडी वाहतूक विभाग - १ दुचाकी, तीनचाकी - १, चारचाकी - १,
कळवा वाहतूक विभाग - २१ दुचाकी, तीनचाकी - ६, चारचाकी - ५,