महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2000 CRPF Commando in Mumbai : मुंबईत 2000 सीआरपीएफ जवान दाखल, एअरपोर्ट ते विधान भवन परिसरात होणार तैनात

दिल्ली, पुणे, गुजरात, महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून सीआरपीएफचे युनिट मुंबईत बोलावले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तीन विशेष विमानाने 2000 सीआरपीएफचे जवान मुंबईत दाखल झाले आहे. ज्याप्रकारे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना विरोध दाखवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर ती केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ( 2000 CRPF commando arrived in Mumbai )

2000 CRPF Commando in Mumbai
मुंबईत 2000 सीआरपीएफ जवान दाखल

By

Published : Jun 29, 2022, 7:26 PM IST

मुंबई -महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये उद्या गुरुवार दिनांक 30 रोजी महाविकास आघाडीला बहुमत चाचणीचे निर्देश राज्यपालांनी दिले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्या मुंबईत परत येणार आहेत. त्यावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबईमध्ये 2 हजार सीआरपीएफ जवान दाखल झाले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ( 2000 CRPF commando arrived in Mumbai ) ( 2000 CRPF Commando in Mumbai )


विमानाने 2000 सीआरपीएफचे जवान मुंबईत दाखल -दिल्ली, पुणे, गुजरात, महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून सीआरपीएफचे युनिट मुंबईत बोलावले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तीन विशेष विमानाने 2000 सीआरपीएफचे जवान मुंबईत दाखल झाले आहे. ज्याप्रकारे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना विरोध दाखवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर ती केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आधी केंद्र सरकारने सर्व आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान तैनात केले होते.

एअरपोर्ट ते विधान भवन या परिसरात तैनात करणार - सीआरपीएफ जवानाना प्रामुख्याने एअरपोर्ट ते विधान भवन या परिसरात तैनात करणार असून ज्यावेळी सर्व आमदार बसमधून मतदान चाचणीसाठी त्यावेळी कोणत्याही प्रकारचा हल्ला अडचण या आमदारांच्या वाटेला येऊ नये, ही खबरदारी घेण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहे. यामुळे मुंबईमध्ये आमदारांना पूर्णतः संरक्षण मिळेल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details