महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Childrens Vaccination Mumbai : मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी २०० केंद्रांवर होणार लसीकरण - Childrens Vaccination Mumbai

१५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण ( Childrens Vaccination ) सुरू करण्यात आले आहे. लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी येत्या सोमवारपासून लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून २०० लसीकरण केंद्रांवर लसीकरण ( Vaccination at 200 Immunization Centers ) केले जाणार आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

By

Published : Jan 7, 2022, 8:45 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले वर्षभर कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Corona Preventive Vaccination ) सुरू आहे. नुकतेच १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण ( Childrens Vaccination ) सुरू करण्यात आले आहे. लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी येत्या सोमवारपासून लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून २०० लसीकरण केंद्रांवर लसीकरण ( Vaccination at 200 Immunization Centers ) केले जाणार आहे. यामुळे लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • लसीकरण मोहीम

मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या एक वर्षात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षावरील वयोवृद्ध, गरोदर महिला, स्तनदा माता, १८ ते ४४ वयातील नागरिक, असे विविध टप्पे करत पालिकेने लसीकरण मोहीम सुरू ठेवली आहे. मुंबईत आतापर्यंत १०७ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९० टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

  • २०० केंद्रांवर लसीकरण

या लसीकरणादरम्यान १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरण ३ जानेवारीपासून सुरु झाले असून शुक्रवारपर्यंत ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या ९ लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी सोमवारपासून आणखी २०० लसीकरण केंद्रावर मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याने २८ दिवसांत ९ लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला आहे.

  • सध्या 'या' केंद्रावर लसीकरण सुरू

विभाग - लसीकरण केंद्र
ए,बी,सी,डी,ई - भायखळा रिचर्ड्स ॲड क्रुडास
एफ उत्तर,एल,एम पुर्व,एम पश्‍चिम -सोमय्या जंम्बो कोविड केंद्र चुनाभट्टी
एफ दक्षिण,जी दक्षिण,जी उत्तर - वरळी एनएससीआय डोम जंम्बो कोविड केंद्र
एच पुर्व,के पुर्व,एच पश्‍चिम -बीकेसी जंम्बो कोविड केंद्र
के पश्‍चिम,पी दक्षिण - नेस्को जंम्बो कोविड केंद्र गोरेगाव
आर दक्षिण,पी उत्तर - मालाड जंम्बो कोविड केंद्र
आर मध्य,आर उत्तर - दहीसर जंम्बो कोविड केंद्र
एन,एस- क्राम्प्टन ॲन्ड ग्रीव्हस कोविड केंद्र कांजूरमार्ग
टी - रिचर्ड्स ॲन्ड क्रुडास कोविड केंद्र मुलूंड

हेही वाचा -Mayor violated COVID 19 rules: ठाणे महापौरांकडूनच कोरोनाचे नियम पायदळी! गर्दीत उद्घाटन सोहळा

ABOUT THE AUTHOR

...view details