महाराष्ट्र

maharashtra

आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या, चेंबूर कॅम्पात खळबळ

By

Published : Aug 19, 2022, 9:53 AM IST

Updated : Aug 19, 2022, 10:22 AM IST

युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ या तरुणाशी तिचे सुत जुळले. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता. मात्र, तरीदेखील हर्षलने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी विवाह केला.

20 year old woman commits suicide
20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

मुंबई मागासवर्गीय जातीचे असल्यामुळे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. चेंबूर कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात RCF Police case आला आहे. त्याप्रकरणी विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून मुलीच्या पतीसह सासू-सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युक्ता असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे 20 year old woman commits suicide नाव आहे.

युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ या तरुणाशी तिचे सुत जुळले. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता. मात्र, तरीदेखील हर्षलने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी विवाह केला.

राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या दोघांनी विवाह केल्यानंतर हर्षलच्या घरच्यांना समजले. ते दोघेही चेंबूर कॅम्प परिसरात रूम भाड्याने घेऊन राहत होते. 25 जुलै रोजी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा हर्षलने युक्ताला मारहाण केली. त्यानंतर 26 जुलैला युक्ताने राहत्या घरात गळफास लावून Yukta Sankapl suicide आत्महत्या केली. त्या दिवशी युक्ता राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. युक्ता ही मागासवर्गीय असल्यामुळे सासरच्या मंडळींचा तिला नकार होता. आरसीएफ पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306 498 323 504 34, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 3 आर आणि 3 एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात Atrocity case in Chembur आला आहे.

हेही वाचा पुन्हा एकदा निर्भयाप्रमाणे घटना, जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण

Last Updated : Aug 19, 2022, 10:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details