मुंबई -आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस या इंधन दरवाढीच्या बातम्या वाचल्या असतील. पण, आता लवकरच तुम्हाला चहाच्या दरवाढीच्या बातम्या देखील वाचायला मिळणार आहेत. कारण, वाढत्या महागाईमुळे चहा व कॉफी असोसिएशनने चहा व कॉफीचे दर ( Increase in tea and coffee prices ) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
माहिती देताना टी कॉफी असोसिएशनचे पदाधिकारी हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत गुरुवारी 48 नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद
..यामुळे घेतला निर्णय
एका बाजूला वाढलेले इंधन दर, तर दुसर्या बाजूला साखर, दूध, चहा व कॉफीचे इतर घटक पदार्थ यांच्या वाढलेल्या किमती, त्यामुळे चहा व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे टी कॉफी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच ही दरवाढ असल्याचे त्यांनी सांगितले.
2 ते 5 रुपयांची दरवाढ
या वाढत्या किमतीनुसार सध्या तुम्हाला पाच रुपयाला मिळणारी चहा आता सात ते दहा रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. सामान्य माणसाला आधीच महागाईच्या झळा पोहचत आहेत. त्यातच आता रोज सकाळी ताजेतवाने करणारे पेय चहादेखील महाग झाले आहे.
हेही वाचा -Gopal Shetty Challenge : "... तर कोटीचे बक्षीस देणार"; खासदार गोपाळ शेट्टींचे आव्हान