मुंबई -राज्यात आज 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 306 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकवरी रेट हा 97.61 टक्के इतका आहे. त्याचबरोबर, राज्यात आज 85 नव्या ऑमायक्रॉन रग्णांची नोंद झाली आहे. तसेच, आज मुंबईत (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा -Dharavi Covid Cases Increased : धारावीत पुन्हा कोरोना रुग्ण वाढले.. दिवसभरात १७ रुग्णांची नोंद
मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते. त्यात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. काल रुग्णसंख्या एक हजारच्या वर गेली होती. आज त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या दोन हजारच्या पार गेली आहे. आज (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
आज 2 हजार 510 नवे रुग्ण -
आज 29 डिसेंबरला 2 हजार 510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज 251 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 75 हजार 808 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 48 हजार 788 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 16 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 8 हजार 60 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 682 दिवस इतका आहे. मुंबईमधील 45 इमारती आणि एक झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.10 टक्के इतका आहे.