मुंबई -गेल्या अडीच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील जनतेची गैरसाेय राेखण्यासाठी महामंडळाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून ८०० कंत्राटी चालकांना घेतले आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या २०१९ मधील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवर असेलेले सुमारे २ हजार २०० चालक तथा वाहक यांना नोकरीचा प्रतीक्षेत आहे. मात्र, याकडे महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने एसटी महामंडळाचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.
- प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचे काय?
गेल्या ८६ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने अनेक प्रयत्न करूनही केवळ २७ हजार कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. यामध्ये चालक- वाहकांची संख्या अत्यल्प म्हणजे केवळ १० टक्के आहे. त्यामुळे एसटीची १० टक्के वाहतूक सुरू आहे. एसटी प्रशासनाच्या मते २३५ आगार अंशतः सुरू झाले आहेत. वस्तुतः त्यापैकी १०० आगारातून केवळ १-२ एसटी बसेस धावतात. ग्रामीण भागातील जनतेची गैरसाेय राेखण्यासाठी महामंडळाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून ८०० कंत्राटी चालकांना घेतले आहे. त्यानंतर महामंडळातील यांत्रिकी कर्मचारी, सहायक वाहतूक निरिक्षकांना चालक तर वाहतूक नियंत्रकांना वाहकाचे काम देण्यात येणार आहे. महामंडळात यांत्रिकि कर्मचारी १३ हजार ५००, वाहतूक सहायक ३५० आणि वाहतूक नियंत्रक दाेन हजार ४४० आहेत. यापैकी बहुतेक कर्मचारी आता सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे हे कर्मचारी चालक-वाहक पदावर काम करण्यासाठी उत्सुक नसल्याचे समजते. त्यातच आतापर्यत सेवानिवृत्त झालेल्या ४१७ कर्मचाऱ्यांनी चालक पदासाठी अर्ज केला आहे. तर ८०० कंत्राटी चालक महामंडळाने सध्या घेतले आहेत. संपाचा परिस्थितीत महामंडळाच्या सन २०१९ च्या भरती प्रक्रियेतील प्रशिक्षण पूर्ण झालेले एक हजार उमेदवार व किरकोळ चाचण्या बाकी असलेले सुमारे १२०० उमेदवार तातडीने उपलब्ध होऊ शकतात. मात्र एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली विनंती