महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Married woman rape Dharavi : धारावीत चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींना अटक - धारावी बलात्कार बातमी

भल्या पहाटे 19 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या घरात घुसून 2 जणांनी बलात्कार ( Married woman rape Dharavi ) केल्याची घटना धारावीत घडली ( Dharavi rape news ) होती. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही आरोपींना 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

abuse
abuse

By

Published : May 17, 2022, 9:48 AM IST

मुंबई - भल्या पहाटे 19 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या घरात घुसून 2 जणांनी बलात्कार ( Married woman rape Dharavi ) केल्याची घटना धारावीत घडली ( Dharavi rape news ) होती. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही आरोपींना 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जामीन की अटक, सत्र न्यायालयात सुनावणी

चाकूच्या धाकावर बलात्कार करण्यात आला होता. आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी धारावी पोलीस तपास करत होते. या प्रकरणी नराधमांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376, 376 (डी), 425, 354, (ए) 354 (बी), 354 (डी), 506(2), भादवि सह कलम 67, 67 (अ), 66 (इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धारावी परिसरात तक्रारदार 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहाते. ती घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीने या घटनेचे चित्रीकरण केले. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा -Navi Mumbai APMC Market Rates : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे भाजीपाल्याचे बाजारभाव

ABOUT THE AUTHOR

...view details