महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Crime : स्किमरच्या सहाय्याने एटीएममधून लंपास केले 2 लाख 65 हजार रुपये - एटीएममधून काढले 2 लाख

मुलुंडच्या हनुमान चौक परिसरामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India, Mulund) एटीएम मध्ये स्किमरच्या सहाय्याने (Money Withdraw Via Skimmer) खातेधारकांच्या खात्यातून दोन लाख 65 हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

By

Published : Dec 10, 2021, 5:27 PM IST

मुंबई - स्किमरच्या साह्याने खाते धारकांच्या खात्यातून (Money Withdraw Via Skimmer) तब्बल दोन लाख 65 हजार रुपये लंपास करण्याची मुलुंड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. एटीएम मशीन सुद्धा सुरक्षित नसल्याचे अनेकदा निदर्शनास आलेला आहे. असंच एक प्रकरण मुलुंड येथे उघडकीस आलेला आहे.

एटीएममधून लंपास केले 2 लाख 65 हजार रुपये
मुलुंडच्या हनुमान चौक परिसरामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India, Mulund) एटीएम मध्ये स्किमरच्या सहाय्याने खाते धारकांच्या खात्यातून दोन लाख 65 हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत 18 खाते धारकांच्या खात्यातून पैसे गेले असल्याच्या तक्रारी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. या बँकेच्या एटीएम मध्ये 5 डिसेंबर पूर्वी अज्ञातांनी स्कीमर मशीन बसविली होती. आणि या मशीनच्या सहाय्याने या
एटीएमचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या कार्ड डिटेल आणि पिन होल कॅमेरा च्या सहाय्याने खाते धारकांचा पासवर्ड नोंदविला गेला होता.


बँकेने केले पैसे रिफंड

पोलिसांना एकाच एटीएम मधून व्यवहार केलेल्या नागरिकांच्याच खात्यातून पैसे वजा होत असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान बँक व्यवस्थापनाने या संदर्भात तातडीने पावले उचलत ज्या खाते धारकांच्या खात्यातून पैसे वजा झाले आहेत त्यांना त्यांचे पैसे तातडीने रिफंड केले आहेत. परंतु अशा पद्धतीने स्किमरच्या सहाय्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याविरोधात नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि याचा शोध सध्या नवघर पोलीस घेत आहेत यासाठी या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

हेही वाचा -NCP Activist Arrested In Navi Mumbai : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details