मुंबई -बिहार राज्यातून अनधिकृतपणे हस्तिदंत मुंबईतील घाटकोपर परिसरात विकण्यास आलेल्या दोन जणांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट सात ने अटक केली आहे. हस्तिदंताच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी सचिन पासवान (26) व सरोजकुमार उमाशंकर पासवान या आरोपींना अटक केली आहे.
हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक - मुंबई पोलीस बातमी
बिहार राज्यातून अनधिकृतपणे हस्तिदंत मुंबईतील घाटकोपर परिसरात विक्रीसाठी आणले होते. या प्रकरणी दोन आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील एलबीएस रोडवरील सर्वोदय रुग्णालय जवळ ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 किलो 141 ग्रॅम वजनाचे तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे हस्तिदंत पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींच्या चौकशीतून हस्तगत करण्यात आलेले हस्तिदंत हे सरकारी संपत्ती असून बिहार मधील सरकारी कार्यालयातून हे हस्तिदंत चोरी करून ते रेल्वेमार्गे मुंबईत विक्रीसाठी आणले असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी कलम 38, 48, 48अ वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.