मुंबई- गेल्या १९९३ ला अजमेरमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी जलीस अन्सारी उर्फ 'डॉ. बॉम्ब' याला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून तो काल (गुरुवार) फरार झाला होता.
अन्सारी हा६८ वर्षांचा असून अजमेरच्या तुरुंगात आपली शिक्षा भोगत होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला २१ दिवसांची पॅरोल मिळाली होती. त्यामुळे तो आपल्या घरी आला होता. यानंतर तो गुरुवारी मुंबईमधून फरार झाला होता. महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्याला उत्तर प्रदेशातील कानपूरमधून अटक केली आहे.